Ambadas Danve | औरंगाबाद : सध्या मराठवाड्यात चर्चेत असलेल्या ‘३०-३०’ घोटाळ्यात ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांचं नाव समोर येत आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात एका तरुणानं गुंतवणुकीचं आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये एक डायरी सापडली असून त्यात अंबादास दानवे यांचं नाव असल्याचं समजतंय.
दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गुंतवणुकीचा पैसा दुप्पट, तिप्पट करण्याच्या कोणत्याही योजनेत आपला विश्वास नाही. मी अशी कोणतीही गुंतवणूक केली नाही. या प्रकरणात पोलीस तपास करत असतील, तर आपण पूर्णपणे सहकार्य करू”, असं अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, “या घोटाळ्याची अधिकृत कागदपत्रे कुठेही उपलब्ध नाहीत. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. या घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. मला राहायला स्वत:चं घरही नाही. मी आताही माझ्या वडिलांच्या घरात राहतो. तुम्ही बरेच लोक सकाळ-संध्याकाळ माझ्या घरी येत असता, माझी सगळी स्थिती तुम्हाला माहीत आहे.”
नेमकं प्रकरण काय?
मुंबई कॉरिडॉरसाठी औरंगाबादमध्ये २०१६ साली जमिनी घेण्यात आल्या. जमिनीच्या शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखविण्यात आली. गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे मान्य करण्यात आलं. पण, प्रत्यक्ष थेट २५ टाक्याचा परतावा दिला. गोणी भरभरून पैसे आले. आरोपीच्या जाळ्यात ३० गावातील शेतकरी सापडले. २०२१ साली ३० – ३० हा घोटाळा उघडकीस आला.
महत्वाच्या बातम्या :
- Big Boss 16 | ‘बिग बॉस’मध्ये सलमान खानची जागा घेणार ‘ही’ सेलिब्रिटी, चॅनलला भेटला नवीन होस्ट?
- Girish Mahajan | “सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?”; गिरीश महाजन म्हणाले…
- Skin Care Tips | त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने लावा कांद्याचा रस
- Mahindra XUV 400 | ‘या’ उत्कृष्ट फीचर्ससह महिंद्राने लाँच केली इलेक्ट्रिक SUV ‘Mahindra XUV 400’
- Rishabh Pant | “मी सगळ्यांचा आभारी…” ; भीषण अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया