Big Boss 16 | ‘बिग बॉस’मध्ये सलमान खानची जागा घेणार ‘ही’ सेलिब्रिटी, चॅनलला भेटला नवीन होस्ट?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Big Boss 16 | मुंबई: छोट्या पडद्यावरील शो बिग बॉस (Big Boss 16) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बॉलीवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान (Salman Khan) या शोचे सूत्रसंचालन करतो. 105 दिवस चालणाऱ्या या शोसाठी स्पर्धक आणि सूत्रसंचालनाला एक करार करावा लागतो. या करारानंतर स्पर्धकांना आणि सूत्रसंचालकाला शोसाठी 105 दिवस देणे बंधनकारक असते. मात्र, बिग बॉसची वाढती लोकप्रियता बघून निर्मात्यांनी हा सीजन चार आठवड्यांनी वाढवला आहे. जानेवारीमध्ये संपणारा हा शो आता फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

सलमान खानला वाढलेल्या कालावधीमध्ये बिग बॉसला वेळ देता येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याला चित्रपटाच्या शूटिंगमुळे काही दिवस सूत्रसंचालन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या शोमध्ये त्याची जागा आता दुसरी सेलिब्रिटी घेणार आहे. सलमानच्या जागी सूत्रसंचालन करण्यासाठी करण जोहरचं (Karan Johar) नाव घेतलं जात होतं. कारण सलमानच्या अनुपस्थितीमध्ये करणने याआधी शोचे सूत्रसंचालन केले आहे.

मात्र, बिग बॉस करण जोहर नाही, तर दुसरी सेलिब्रेटी होस्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) बिग बॉस 16 होस्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चॅनलकडून याबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

फराह खाने याआधी देखील बिग बॉसचे सूत्रसंचालन केलेले आहे. बिग बॉस 16 मध्ये तिचा भाऊ साजिद खान स्पर्धक म्हणून उपस्थित होता. पण आता तो घरातून बाहेर पडल्यामुळे ती शोचे सूत्रसंचालन करू शकते. फराह खान बिग बॉस 16 सोबतच बिग बॉस OTT 2 देखील होस्ट करू शकते.

महत्वाच्या बातम्या