Kirit Somaiyya | “त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी…”; किरीट सोमय्यांचं शरद पवारांना ओपन चॅलेंज

Kirit Somaiyya | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा पवित्राच घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांना धारेवर धरलं आहे. त्यातच आता सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर त्यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर इडीकडून छाप टाकण्यात आली. त्यावर ‘एका समाजाला धरुन टीका केली जात आहे’, असा आरोप हसन मुश्रीफ यांच्याकडून करण्यात आला. त्यावर बोलताना किरीट सोमय्यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं आहे.

“शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन फिरतात. त्यांनी सुद्धा असं वक्तव्य करावं”, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

“आता तुम्हाला धर्म आठवतो का. किरीट सोमय्या कोल्हापुरात मातेचं दर्शन करायला येत होता. तेव्हा कोल्हापुरात यायला बंदी घातली होती. मंदिरात प्रवेश करताना अटक केली होती. त्यावेळी तुम्हाला धर्म नाही आठवला का?”, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी विचारला.

“पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतींवर कर लावताना, इतरांच्या नावानं भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना तुम्हाला धर्म आठवला नव्हता का?”, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

“हसन मुश्रीफ असो, नवाब मलिक असो की, अस्लम शेख असो. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, तो जेलमध्ये जाणार.” असेही किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.