Share

Sudhir Tambe | “सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा मागणार का?”; सुधीर तांबे म्हणाले, “आम्ही कोणत्याही…”

🕒 1 min readSudhir Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत माघारीचा दिवस देखील संपला, मात्र अद्यापही कोण कोणाला पाठिंबा देतंय, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाही. असं असताना राजकीय वर्तुळात टीकेचे धनी बनलेले सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) मात्र अडचणीत सापडले आहेत. पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sudhir Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत माघारीचा दिवस देखील संपला, मात्र अद्यापही कोण कोणाला पाठिंबा देतंय, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाही. असं असताना राजकीय वर्तुळात टीकेचे धनी बनलेले सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) मात्र अडचणीत सापडले आहेत.

पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष राहून निवडणूक लढवत आहेत. अशातच सत्यजित तांबे आता भाजपचा पाठिंबा मागणार का?, यावर चर्चा रंगली असतानाच सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी यावर भाष्य केलं आहे.

सत्यजित तांबे अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नाही आणि मागणार देखील नाही अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी दिली आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही त्याबाबत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, “भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अद्याप आम्हाला कुणीही पाठिंबा मागितला नसल्याचं सांगितलं. पाठिंबा मागितल्यास विचार करू, असंही ते म्हणाले आहेत. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या