Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ ज्यूसचे सेवन

Immunity Power | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आला की बहुतेक लोक ज्यूस (Juice) पिणे बंद करतात. कारण या ऋतूमध्ये वातावरण गार असल्यामुळे बहुतांश लोक ज्यूसचे सेवन करणे टाळतात. पण हिवाळ्यामध्ये ज्यूसचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हिवाळ्यामध्ये नियमित सकाळी काही फळांचे ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि त्याचबरोबर पचनक्रिया ही सुधारते. या ज्यूसचे सेवन केल्याने शरीर आतून उष्ण राहते. त्याचबरोबर या ज्युसचे सेवन केल्याने तुम्ही या वातावरणात मोसमी आजारापासून दूर राहू शकतात. हिवाळ्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी पुढील ज्यूस प्यायल्याने इम्युनिटी मजबूत होऊ शकते.

गाजर

हिवाळ्यामध्ये गाजर सहज उपलब्ध होतात. हिवाळ्यामध्ये नियमित सकाळी गाजराचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्याचबरोबर नियमित या ज्यूसचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती मजबूत राहू शकते. कारण यामध्ये माफक प्रमाणात आयरन, विटामिन ए, विटामिन सी आढळून येते. त्यामुळे या ज्यूसचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

संत्रा

संत्र्याचा ज्यूस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. त्याचबरोबर नियमित याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती ही वाढते. हा रस प्यायल्याने शरीरातील संसर्ग निघून जातो. परिणामी तुम्ही लवकर आजारी पडत नाही. त्यामुळे हिवाळ्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी संत्र्याच्या ज्यूसचे सेवन केले पाहिजे.

टोमॅटो

हिवाळ्यामध्ये रिकाम्या पोटी टोमॅटोच्या रसचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये माफक प्रमाणात फायबर, पोटॅशियम, सोडियम आणि विटामिन सी उपलब्ध असते. नियमित टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होऊन त्वचा देखील चमकदार होते. हिवाळ्यात टोमॅटोचा रस प्यायल्याने हाडे मजबूत आणि हृदय निरोगी राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या