Girish Mahajan | शुभांगी पाटील नॉट रिचेबल; गिरीश महाजन म्हणाले, “त्या काही फार मोठ्या…”

Girish Mahajan | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी निवडणुकीला उभं राहत असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे यांना भेटले आहे त्यांनी मला पाठिंबा देऊ असं आश्वासन दिलं आहे, असं त्या म्हणाल्या. मात्र आता त्याच नॉट रिचेबल असल्याचं समजतंय. यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. यात खळबळजनक काय मला माहीत नाही. माघारीला अवघे दोन तास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार कुठे जातो? कुठे राहतो? हा त्यांचा प्रश्न आहे.” त्याचबरोबर अर्ज कुणी मागे घ्यावा, कुणी ठेवावा याच्याशी आमचा काही संबंध असल्याचं महाजन यावेळी बोलताना म्हणाले.

“आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो 3 वाजेपर्यंत जाहीर होईल”, अशी माहितीही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, “त्या पक्षाच्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या. त्यांचा आग्रह होता म्हणून प्रवेश दिला. पण तिकीटाची कमिटमेंट दिली नव्हती. त्या काही ज्येष्ठ नेत्या आहेत असं नाही. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. त्यांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे.”

महत्वाच्या बातम्या :

Back to top button