Share

Pathaan Controversy | “हा नंगा नाच जर…”; भगव्या बिकिनीच्या वादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

🕒 1 min read Pathaan Controversy | मुंबई: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला काही ठिकाणी जोरदार विरोध केला जात आहे. तर सेन्सर बोर्डाने ही या चित्रपटातील … Read more

Published On: 

🕒 1 min read

Pathaan Controversy | मुंबई: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप संपलेला नाही. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला काही ठिकाणी जोरदार विरोध केला जात आहे. तर सेन्सर बोर्डाने ही या चित्रपटातील 10 पेक्षा अधिक दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून चांगलाच वादविवाद निर्माण झाला होता. या गाण्यामध्ये दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून वाद सुरू झाला होता. या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटावर वाद सुरू झाला आहे. वाद निर्माण करण्याची काहीच गरज नव्हती. अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केलेली होती. देशामध्ये यापेक्षा अनेक मोठे प्रश्न आहे. त्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रश्न उपस्थित करू नका,” असं म्हणतं संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “पडद्यावर जर नंगा नाच सुरू असेल तर तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकतात. फक्त भगव्या रंगाचे कपडे घातलेले आहे म्हणून तुम्ही ते सीन हटवू शकत नाही”, असं म्हणत त्यांनी सेन्सर बोर्डाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या महिन्यामध्ये ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केलेली होती. तिच्या त्या भगव्या बिकिनीवर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या चित्रपटाला विरोधाला सामोरे जावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या