Sanjay Raut | “भाजपला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचं काहीच पडलं नाहीये का?”; संजय राऊतांचा सवाल 

Sanjay Raut | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवार 19 जानेवारी रोजी बीकेसी मैदानावर सभा होणार आहे. या सभेत विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र, या लोकार्पणापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे प्रकल्प आमच्याच काळातील असल्याचं सांगत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचं काहीच पडलं नाहीये का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, “मुंबईतील बहुतेक सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळातील आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ती कार्यान्वित झाली. उद्घाटनेही झाली. त्याच प्रकल्पासाठी सरकार पुन्हा पुन्हा उद्घाटन करत आहे.”

पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचा हा प्रकार आहे. पंतप्रधानांची एक प्रतिष्ठा असते. ज्या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे, त्याच्या योजना आम्ही केल्या. पण भाजपची ती भूमिकाच असेल आणि पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचं त्यांना काही वाटत नसेल तर त्याला काय करणार?, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

दरम्यान, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील डाव्होस इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले आहे. त्यांच्या या दौऱ्यावर देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले, “दावोसमधून काय येणार हे माहिती नाही. पण, महाराष्ट्रात नाकाखालून जे काही प्रकल्प पळवून नेले आहे, ते आणून दाखवावे. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प हे गुजरात आणि इतर राज्य घेऊन ते आधी घेऊन आला तर दावोसला जाण्याला अर्थ आहे. दावोसला काय घडतं हे चांगलं माहिती आहे. 5 लाख कोटी करार केले असे होता. पण, इथं ते खरंच आले का हे अजून काही सिद्ध होत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.