PM Kisan Yojana | ‘या’ आठवड्यात येणार 13 वा हप्ता, शेतकऱ्यांनी लवकर करून घ्या ‘ही’ कामं

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. शेतकरी आता या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने काही कडक नियम जारी केले आहे. ई-केवायसी आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केलेल्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिन्यामध्ये तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पोहोचेल? याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या आठवड्यात येणार आहे. या योजनेतील तेरावा हप्ता संक्रांतीच्या आधी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तेराव्या हप्त्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली नाही. अशा परिस्थितीत 26 जानेवारीपूर्वी या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे ई-केवायसी असणे अनिवार्य आहे. शेतकरी यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. शेतकऱ्यांना नोंदणीच्या वेळी रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी सादर करावी लागणार आहे. पीएम किसान पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिंक केल्यानंतरच बँकेचे ई-केवायसी पूर्ण करता येते. शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, असे आवाहन सातत्याने सरकारकडून केले जात आहे. कारण या सर्व गोष्टींच्या कमतरतेमुळे 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 12 व्या हप्ता पासून वंचित राहावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या