Urfi Javed | मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोघींचा वाद कधी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत आहे, तर कधी महिला आयोगाकडे जात आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप प्रत्यारोप करत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत उर्फी जावेदला नोटीस पाठवली.
चित्रा वाघ मला जीवे मारण्याची धमकी देत आहे, असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. “मी तिला धमकी नाही तर उघडी-नागडी फिरू नको असा थेट इशारा दिला आहे. मी तिला जीवे मारण्याची धमकी का देऊ?”, असं म्हणतं चित्रा वाघ यांनी आपली बाजू मांडली आहे.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादामध्ये सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई (Trupti Desai) यांची एन्ट्री झाली आहे. उर्फी मुस्लिम असल्यामुळे तिच्यावर बंधन घातली जात आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. तृप्ती देसाई यांच्या वक्तव्यानंतर या वादाला विचित्र वळण आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फीच्या अंगप्रदर्शनामुळे भाजपाने त्या चित्रा वाघ यांनी तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस पाठवली होती. उर्फी जावेद जोपर्यंत आपला नंगानाच थांबवत नाही, तोपर्यंत हा वाद चालूच राहणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Yuvraj Singh | वनडे क्रिकेट संपणार? युवराज सिंगने व्यक्त केल्या भावना
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली
- Rakhi Sawant | प्रेमात पुन्हा धोका मिळाल्यानंतर राखी सावंत म्हणाली, “मी मारून…”
- Supriya Sule | साडीने घेतला पेट, थोड्याने बचावल्या सुप्रिया सुळे
- IND vs SL | “हे कोण बनेगा करोडपती…” ; रोहितच्या निर्णयावर अश्विनची प्रतिक्रया