Yuvraj Singh | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने हा सामना सर्वाधिक धावांनी जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 300 हून अधिक धावांनी सामना जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) इतर खेळाडूंनी अनेक विक्रम केले. मात्र, असे असतानाही माजी खेळाडूने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय संघातील माजी अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता संघाचा खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) चिंतेत आहे.
कालच्या सामन्यामध्ये भारतीय संघ फलंदाजी करत असताना युवराज सिंगने एक ट्विट केले होते. त्याचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. युवराज सिंगने त्याच्या ट्विटमध्ये एकदिवसीय क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाला आहे, “शुभमन गिल उत्कृष्ट खेळाला आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो आणखी शतक झळकावेल. तर दुसऱ्या टोकाला विराट कोहली ही शानदार फलंदाजी करत आहे. असं असतानाही माझ्यासाठी चिंतेची बाब म्हणजे स्टेडियम अर्धे रिकामे आहे. वनडे क्रिकेट संपत आहे का?”
Well played @ShubmanGill hopefully goes on to make a 💯 @imVkohli batting at the other end looking Solid ! But concern for me half empty stadium ? Is one day cricket dying ? #IndiavsSrilanka
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) January 15, 2023
गेल्या काही वर्षांपासून कसोटी आणि टी-20 क्रिकेटच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षात दोन टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. अशा परिस्थितीत एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली
- Rakhi Sawant | प्रेमात पुन्हा धोका मिळाल्यानंतर राखी सावंत म्हणाली, “मी मारून…”
- Supriya Sule | साडीने घेतला पेट, थोड्याने बचावल्या सुप्रिया सुळे
- IND vs SL | “हे कोण बनेगा करोडपती…” ; रोहितच्या निर्णयावर अश्विनची प्रतिक्रया
- Winter Care Tips | खूप थंडी जाणवत असेल, तर करा ‘हे’ उपाय