Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या किमान तापमानात (Temprature) चढ-उतार सुरूच आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने महाराष्ट्रात गारठा अधिक वाढला आहे. उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी वाढल्यामुळे राज्यात थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. राज्यात पुढील चार दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडे सुरू असलेल्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. महाराष्ट्रामध्ये 20 जानेवारी पर्यंत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा कायम आहे.

राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. नाशिकमधील निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. किमान तापमानामध्ये चढ-उतार सुरू असल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट जनसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. या वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत घट दिसून आली आहे. तर, या वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.