Share

Winter Care Tips | खूप थंडी जाणवत असेल, तर करा ‘हे’ उपाय

Winter Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) काही लोकांना साधारण थंडी जाणवते, तर काहींना खूप थंडी जाणवते. अंतर्गतदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना हिवाळ्यामध्ये अधिक थंडी जाणवते. ही लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करत असतात. कारण अतिरिक्त थंडी जाणवत असल्यामुळे सर्दी, ताप आणि डोकेदुखीच्या समस्या उत्पन्न व्हायला लागतात. तुम्हाला पण हिवाळ्यामध्ये अतिरिक्त थंडी जाणवत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अतिरिक्त थंडीपासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. अतिरिक्त थंडीपासून बचाव करण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.

मध

मधामध्ये अँटिफॅक्टरियल आणि अँटिव्हायरस उपलब्ध असतात. त्याचबरोबर मधाच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी कोमट पाण्यासोबत मधाचे सेवन केल्याने तुम्ही अतिरिक्त थंडीपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर नियमित याच्या सेवनाने घसा दुखीची समस्या देखील कमी होऊ शकते.

आले, गुळ आणि तूप

हिवाळ्यामध्ये अतिरिक्त थंडीपासून बचाव करण्यासाठी आले गुळ, आणि तूप एकत्र करून खावे. यासाठी आले बारीक करून त्यामध्ये गूळ आणि तूप मिसळून मंद आचेवर गरम करून घ्यावे. या मिश्रणाचे द्रावण तयार झाल्यावर त्याला थंड करून, त्याच्या छोट्या आकाराच्या गोळ्या तयार करून घ्या. जेव्हा तुम्हाला अतिरिक्त थंडी जाणवायला लागेल, तेव्हा तुम्ही या गोळीचे सेवन करू शकतात.

गरम दूध आणि हळद

हळदीचा प्रभाव उष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये नियमित गरम दुधामध्ये हळद मिसळून प्यायल्याने अतिरिक्त थंडीपासून बचाव होऊ शकतो. त्याचबरोबर नियमित हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन पासून दूर राहू शकतात.

व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने शरीरात रक्ताभिसरण योग्य होते. त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यामध्ये नियमित व्यायाम केल्याने तुम्ही अतिरिक्त थंडीपासून सुरक्षित राहू शकतात. व्यायामासोबतच तुम्ही प्राणायामही करू शकतात. नियमित व्यायाम केल्याने संपूर्ण शरीरात उष्णता निर्माण होते आणि शरीर सक्रिय राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Winter Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) काही लोकांना साधारण थंडी जाणवते, तर काहींना खूप थंडी जाणवते. अंतर्गतदृष्ट्या …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now