Share

Google Pay Refund | Gpay वर पेमेंट फेल झाले, पण रिफंड मिळाले नाही? तर करा ‘या’ पद्धती फॉलो

🕒 1 min read Google Pay Refund | टीम महाराष्ट्र देशा: गुगल पे (Google Pay) भारतातील आघाडीचे यूपीआय (UPI) पेमेंट ॲप आहे. या ॲपद्वारे फक्त पेमेंट नाही, तर मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट इत्यादी गोष्टी देखील करता येतात. या ॲपच्या मदतीने तुम्ही सहज पैशाची देवाण-घेवाण करू शकतात. आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती या ॲपचा वापर करत असतो. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Google Pay Refund | टीम महाराष्ट्र देशा: गुगल पे (Google Pay) भारतातील आघाडीचे यूपीआय (UPI) पेमेंट ॲप आहे. या ॲपद्वारे फक्त पेमेंट नाही, तर मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट इत्यादी गोष्टी देखील करता येतात. या ॲपच्या मदतीने तुम्ही सहज पैशाची देवाण-घेवाण करू शकतात. आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती या ॲपचा वापर करत असतो. बऱ्याच वेळा नेटवर्क समस्येमुळे गुगल पे काम करत नाही. अनेकदा पेमेंट अयशस्वी झाल्यानंतर आपल्या अकाउंटमधून पैसे डेबिट झालेले असतात. काही वेळा ही रक्कम लगेच परत मिळते, तर काही वेळा ही रक्कम परत मिळत नाही. तुम्हाला पण या समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गुगल पे रिफंड मिळवण्यासाठी काही पद्धती सांगणार आहोत. या पद्धतींचा वापर करून तुम्ही गुगल पे रिफंड मिळवू शकतात.

गुगल पेद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर तुम्हाला साधारणपणे तीन ते पाच दिवसांमध्ये रिफंड मिळते. परंतु, तुम्हाला जर तीन ते पाच दिवसांमध्ये गुगल पेकडून रिफंड मिळाले नाही, तर तुम्ही पुढील पद्धतीचा वापर करून रिफंड मिळवू शकतात.

गुगल पे (Google Pay) रिफंड मिळवण्यासाठी पुढील पद्धती फॉलो करा

कॉल

इतर बँकिंग सेवांप्रमाणे गुगल पेमध्ये देखील व्हॉइस सपोर्ट सिस्टीम उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला 1800-419-0157 या टोल फ्री क्रमांकवर कॉल करावा लागेल. या नंबरवर कॉल करण्यासाठी तुम्हाला गुगल पे वेरिफिकेशन कोड जनरेट करावा लागेल. यासाठी तुम्हाला गुगल पे सेटिंगमध्ये जाऊन, Privacy and Security मध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Get OTP या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ओटीपी मिळाल्यानंतर तुम्ही गुगल पे कस्टमर केअरला संपर्क साधून रिफंड मिळवू शकतात.

चॅट

तुम्ही चॅटच्या माध्यमातून गुगल पे ॲपवरून रिफंड मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला गुगल पे ॲप उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या प्रोफाईल चित्रावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सेटिंगवर क्लिक करून Help and Feedback पर्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Get Help या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेजच्या खाली उपलब्ध असलेल्या कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढच्या पेजवर Contact us हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर चॅट ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवून, कस्टमर केअरला कनेक्ट करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Technology

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या