Weather Update | राज्यात मुंबईसह ‘या’ ठिकाणी वाढली हुडहुडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या वातावरणात (Weather) चांगलाच बदल दिसून आला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी तापमानाचा (Temprature) पारा घसरल्याने थंडी (Cold) चा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंडीची लाट राज्याच्या  दिशेने येत आहे. त्यामुळे राज्यात हुडहुडी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टित वाढ झाली आहे. उत्तर भारतातील शीत वारे दक्षिणेकडे वाहत असल्याने राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईचे तापमान किमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. मुंबईतील तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. पुढील दोन दिवस या तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह कोकणातही चांगलीच थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यामध्ये किमान तापमानात घट दिसून आली आहे. किमान तापमानात घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी कायम आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील गारठा कायम राहणार आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी देखील तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आला आहे.

उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 17 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांमध्ये थंडीची लाट वाढणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि बिहार या ठिकाणी 17 ते 20 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

Back to top button