Urfi Javed | मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाने नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद अद्याप संपलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं.
उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीवरून चित्रा वाघ आणि महिला आयोग यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत आता उर्फी जावेद (Urfi Javed) ने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाची आता पोलिसांनीदेखील दखल घेतली आहे. उर्फीने आज मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. ती म्हणाली, “माझ्या पसंतीने मला कपडे घालण्याचा अधिकार आहे. व्हायरल फोटोंना मी थांबवू शकत नाही. कामासाठी लागतात, असे कपडे मी घालते.”
“मला माझ्या पसंतीने कपडे घालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मला राज्यघटनेनं दिलाय. मी जे कपडे घातले ते माझ्या पसंतीचे घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही”, असंही उर्फी जावेद (Urfi Javed) ने जबाबात म्हंटल आहे.
मी जे पकडे घातले ते माझ्या कामाच्या हिशोबाने घालते. त्यावरून माझं फोटो शूट होत असते. कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरा घेऊन आलेले लोकं माझे फोटो काढतात. ते फोटो व्हायरल होतात. ते मी कसे थांबवू?, असा सवाल तीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात विचारला.
महत्वाच्या बातम्या :
- Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंच्या अडचणीत वाढ; शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप
- Aaditya Thackeray | “स्वतःचे खोके, दुसऱ्यांना धोके”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका
- Shubhangi Patil | सत्यजित तांबेंना शुभांगी पाटलांचं आव्हान; म्हणाल्या, “अब राजा का बेटा राजी नही बनेगा…”;
- NCP | राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या निकटवर्तीय खासदाराचं सदस्यत्व रद्द
- Nitesh Rane | “पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किती हिंदू द्वेष करणार?”; नितेश राणेंचा खोचक सवाल