Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंच्या अडचणीत वाढ; शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शुंभागी पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता.

त्यामुळे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झाले असताना निर्णय न झाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. शुभांगी पाटील यांनी भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळणार हे दिसताच, शुभांंगी पाटील यांनी आज मुंबईत मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीनंतर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने शुभांगी पाटील यांची ताकद वाढली असून सत्यजित तांबे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

असे असतानाच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर वकील अभिषेक हरीदास यांनी एक गंभीर आरोप केला आहे. सत्यजित तांबेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिली आहे. तांबे यांच्या २०१४, २०१९ आणि २०२३ च्या शपथपत्रात तफावत आहे असं वकिलांनी म्हटलंय. तसेच, जमीन खरेदी आणि म्युच्युअल फंडाचा तपशील त्यांनी लपवला असा आरोप तांबे यांच्यावर करण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या :