Atul Bhatkhalkar | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडत सेनेचे दोन वेगळे गट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सत्तेत आले. तेव्हापासून विरोधी पक्षांकडून शिंदे गटाला गद्दार म्हणत वारंवार डिवचलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक टीका केली आहे. “एकनाथ शिंदे आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते. आता जरा काम बिघडलं”, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. अजित पवारांनी लगावलेल्या या टोल्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवारांना खोचक सवाल केला आहे.
तुम्ही ७२ तासांसाठी बिघडला होतात का दादा? pic.twitter.com/oHTK5hhsi9
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2023
“तुम्ही ७२ तासांसाठी बिघडला होतात का दादा?”, असा खोचक सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवारांना विचारला आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करुन ७२ तासांचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची भल्या पहाटे शपथ घेतली होती. याच पार्श्वभूमीवर अतुल भातखळकरांनी अजित पवारांना खोचक सवाल केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nitin Gadkari | मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
- Devendra Fadnavis | “योग्यवेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू”; फडणवीसांचं सूचक वक्तव्य
- Ajit Pawar | “पुणे शहराचे ‘जिजाऊ नगर’ नामांतर करावे का?”; अजित पवार म्हणाले, “पुणे म्हणजे…”
- Nashik Graduate Constituency Election | बंड पुकारत भाजपच्या उमेदवाराने पाठिंब्यासाठी ठोठावले ‘मोतोश्री’चे दार
- Dipak Kesarkar | पंकजा मुंडेंना ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफरची दीपक केसरकरांनी उडवली खिल्ली