Nitin Gadkari | मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

Nitin Gadkari | नागपूर :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात (Nitin Gadkari) तब्बल तीन वेळा धमकीचा फोन असल्याची माहिती समोर येतेय. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले.

नितीन गडकरी यांना जीवे मारू अशा आशयाचे हे धमकीचे कॉल होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आली असून, खंडणी मागण्यात आली आहे. सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे कॉल आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत, आणि चौकशी केली जात आहे. गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे.

सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्यातासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला. सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूरमध्येच आहे. त्यामुळे कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.