Ashok Chavan | मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. पंकजा मुंडे यांनीही अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपली नाराजीही व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन दिलं आहे. भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी दिलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? या संदर्भात विचारले असता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे.
ते म्हणाले, “पंकजा मुंडे मराठवाड्यातील भाजपाच्या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांनी अनेक चांगली कामे केलेली आहेत. मी त्यांना सभागृहात अनेक वर्षांपासून पाहात आलो आहे. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. कोणत्या पक्षात जावं आणि कोणत्या पक्षात नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.”
“पंकजा मुंडे हुशार आहेत, समजदार आहेत. त्या राजकीय परिस्थिती जाणतात. त्यावर मी भाष्य करणे उचित नाही. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो हे त्यांनी ठरवावं,”असं म्हणत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सल्ला दिलाय.
दरम्यान, “मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) म्हणालेत.
“मातोश्रीचं दार त्यांच्यासाठी उघडं असलं तरी त्या दाराने पंकजा मुंडे कधीही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचे घर आहे. मनातले मांडे मनातच राहणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत राजकीय वक्तव्यं करण्यात येतात. त्याला काहीही अर्थ नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांकडून दखल; उर्फी जावेदला पाठवली नोटीस
- Ajit Pawar | “एकनाथ शिंदे आमच्यासोबत असताना चांगले होते, तिकडे गेल्यापासून…”; अजित पवारांचा मिश्किल टोला
- Jitendra Awhad | “चंद्रकांत पाटलांची भेट मारूतीराया घेणार आणि…”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
- Brazil Democracy – ब्राझीलमध्ये लोकशाहीवर हल्ला
- Ajit Pawar | “मी अगोदरच बाळासाहेब थोरातांना…”; सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट