Ajit Pawar | “एकनाथ शिंदे आमच्यासोबत असताना चांगले होते, तिकडे गेल्यापासून…”; अजित पवारांचा मिश्किल टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | मुंबई : एकनाथ शिंदे  बंडानंतर शिवसेनेतच दोन वेगळे गट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. तेव्हापासून विरोधी पक्षांकडून शिंदे गटाला गद्दार म्हणत डिवचलं जात आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक टीका केली आहे. एकनाथ शिंदे आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते. आता जरा काम बिघडलं”, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

ते म्हणाले, “हे बघा, आता काम बिघडलं म्हणजे थेट हेडलाइनच होणार, अजित पवार टीका करताना घसरले असंही म्हटलं जाणार. पण महाविकास आघाडी सरकार असताना चाकणमध्ये वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता. दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. आम्हाला सभागृहात मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर काही बोलायला तयार नाही.”

“नंतर म्हणाले आता तो गेला जाऊदेत दुसरा आणू. कशाचा दुसरा आणता? अहो बेरोजगारी किती वाढली आहे जरा बघा. मध्यंतरी पोलिसांची पदं भरायची होती. १२ हजार पदांसाठी १२ लाख अर्ज आले होते. डॉक्टर, इंजिनिअर्स यांनी अर्ज केले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी हे अर्ज आले आहेत. किती बेरोजगारी वाढली आहे तुम्हीच बघा असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आमचं सरकार असताना एसटी आंदोलनातही काही शहाणे आमदार तिथे जाऊन झोपले होते. एकजण म्हणायचा डंके की चोट पे करूंगा, डंके की चोट पे करूंगा आता डंका कुठे गेला? असा खोचक सवालही पवारांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर सुरूवातीला हे दोघंच टिकोजीराव होते. आता २० मंत्री आहेत अजून विस्तार झालेला नाही. मी पालक मंत्री असताना चटचट निर्णय घेत होतो. आता बघू, करू असं धोरण आहे. मंत्र्यांचा वेळ महत्त्वाचा आहे पण लोकांचा वेळ नाही का? असाही प्रश्न अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या :