Share

Ajit Pawar | “मी अगोदरच बाळासाहेब थोरातांना…”; सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

🕒 1 min readAjit Pawar | पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला. परंतु काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही.  भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला. परंतु काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही.  भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना तात्काळ पाठिंबा देण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळं हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपचा हात होता, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात चांगलेच अडचणीत सापडले आहेत. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. पटोले यांच्या वक्तव्यावर भाष्य करत राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishn Vikhe-Patil) यांनी पलटवार केला. विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोले यांनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा, असं ते म्हणाले.

याच मुद्द्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, “दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते.”

“मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते,” असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!