Radhakrishna Vikhe-Patil | “चंद्रकांत खैरे यांच्या बुद्धीची…”; राधाकृष्ण विखे-पाटलांचा हल्लाबोल

Radhakrishna Vikhe-Patil | सोलापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. अशातच भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी दिलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? या संदर्भात विचारले असता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.

“मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) म्हणाले. त्यांच्या या विधानाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला आहे.

विखेपाटील म्हणाले, पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचे विधान पाहता मला त्यांच्या बुद्धीची किव करावीसी वाटते. चंद्रकांत खैरे यांनी असे बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे. पंकजाताईंची भूमिका पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. पंकजा मुंडे या पक्षाचे नेतृत्व करत आहेत आणि करत राहणार, असंही राधाकृष्ण विखेपाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी यावेळी बोलताना म्हंटल.

चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य काय?

“पंकजा मुंडे यांच्याबाबतीत भाजप राजकारण करत आहे. आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत जे काही म्हणाले त्यात तथ्य आहे. पंकजा आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. कधीही काही होऊ शकते”, असेही त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.