Share

Radhakrishn Vikhe-Patil | “विश्वासघात कोणी केला, हा सवाल नाना पटोलेंनी बाळासाहेब थोरात यांना विचारावा” – राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishn Vikhe-Patil | सोलापूर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला होता. काँग्रेसकडून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे इच्छुक होते. मात्र, काँग्रेसनं त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं सत्यजीत यांनी नमतं घेतल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.

भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना तात्काळ पाठिंबा देण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळं हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपच होता, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. पटोले यांच्या वक्तव्यावर भाष्य करत राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishn Vikhe-Patil) यांनी पलटवार केला.

विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोले यांनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा, असं ते म्हणाले. पुढे ते म्हणतात, “विश्वासघात झाला की नाही. हे सर्व त्यांच्या सहमतीने झाले हे मला माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं. भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही.”

काँग्रेसमध्ये कोणते गट आहेत हे माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये नसल्याने तेथे काय सुरू आहे मला कल्पना नाही. या सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झाली असल्याचं विखे-पाटील म्हणालेत. काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही परिस्थिती आहे. लोकांना काँग्रेस पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सत्यजित तांबे यांची अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असंही विखेपाटील यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Radhakrishn Vikhe-Patil | सोलापूर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला होता. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now