Share

उद्धव ठाकरेंवर थेट गुन्हा दाखल करा! मुंबईत पुकारलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप

उद्धव ठाकरेंनी मुंबईत पुकारलेल्या आंदोलनावर अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा तीव्र आक्षेप. शिवाजी पार्क सायलेन्स झोन असल्याने हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा करत कारवाईची मागणी.

Published On: 

Gunaratna Sadavarte addressing media about Uddhav Thackeray protest in Mumbai

मुंबई– राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या उपोषणाचे लोण आता थेट मुंबईत धडकले आहे. पण यावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत. उद्धव ठाकरेंनी आज मुंबईत पुकारलेलं आंदोलन बेकायदेशीर असून त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्तें (Gunaratna Sadavarte) यांनी केली आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांचं आंदोलन सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाने आज (१९ जुलै) मुंबईत मोठ्या आंदोलनाची हाक दिली. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. पण याच आंदोलनावर आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

Uddhav Thackeray : शिवाजी पार्कला परवानगी नाहीच, सदावर्तेंचा दावा

सदावर्तेंनी थेट पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या या भूमिकेवर हल्लाबोल केला. त्यांच्या मते, उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी आंदोलनासाठी निवडलेली जागा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मुंबईत आझाद मैदाना व्यतिरिक्त कुठेही आंदोलन करायला कायदेशीर बंदी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अधिकृत सूत्रांकडून आणि पोलिसांकडून माहिती घेतली असता, ठाकरेंच्या या आंदोलनाला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचं सदावर्तेंनी म्हटलं आहे. शिवाजी पार्क हा मुळात ‘सायलेन्स झोन’ आहे. त्यामुळे स्वतःच्या राजकारणासाठी लोकांची शांतता भंग करणं कायद्याला धरून नाही, असं ते म्हणाले.

त्यामुळेच आता सदावर्तेंनी थेट पोलीस आयुक्तांना आणि वरिष्ठ निरीक्षकांना पत्र लिहिलं आहे. प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतंही मैदान वापरता येत नसल्याने ठाकरेंवर कलम २२३, २९१, २९२ आणि १९६ अंतर्गत तात्काळ कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली आहे. याबाबत पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही