कोल्हापुरात ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे नेते राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. काल, राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू शेट्टी यांच्या पुतळ्याला पारंपरिक कोल्हापुरी ‘पायताणा’ने (चपलेने) मारून निषेध नोंदवला.
या कृतीचा निषेध करण्यासाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ आणि ‘शक्तिपीठ विरोधी कृती समिती’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. क्षीरसागर यांच्या समर्थकांनी केलेल्या त्या निदर्शनांचा निषेध करण्यासाठी या दोन्ही संघटनांनी आज कोल्हापुरात निषेध मोर्चा काढला.
Raju Shetti-Rajesh Kshirsagar supporters protest
या मोर्चादरम्यान राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची व संघर्ष झाला, ज्यामुळे शिवाजी महाराज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
काल याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात, राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी राजू शेट्टी यांच्या पुतळ्याला पारंपरिक कोल्हापुरी पायताण मारून निषेध व्यक्त केला होता.
या घटनेच्या प्रत्युत्तरात, आज त्याच ठिकाणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ आणि ‘शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती’ यांनी प्रति-निषेध आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही दोन्ही नेत्यांचे समर्थक समोरासमोर आल्याने मोठा राडा झाला.
ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी राजू शेट्टी यांच्या पुतळ्याला कोल्हापुरी पायताण मारून निषेध नोंदवला होता, त्याच ठिकाणी राजू शेट्टी यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेवर ‘दुग्धाभिषेक’ केला. कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि आदल्या दिवशी झालेल्या निषेध आंदोलनाचा निषेध केला.
यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, नजीकच्या काळात राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तरीही, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये! ‘ग्राहकांच्या आरोग्याशी खेळाल तर कारवाई’
- विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय! नागपुरात DJ बंदीचा मोठा आदेश; आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत कठोर निर्बंध
- जरांगेंनी उपोषण सोडावं! ‘मराठा आरक्षणाच्या 90% मागण्या मान्य’, गिरीश महाजनांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











