Share

४००० कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले पडद्यावरून सुटलेला बाण….

दिल्लीत पार पडलेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला रामदेव बाबांनी हजेरी लावली. ४००० कोटींच्या या सिनेमाचे व्हिज्युअल्स पाहून त्यांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.

Published On: 

Ramayan Movie Trailer launch Baba Ramdev reaction with Ranbir Kapoor and Yash

आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची वेळ योगगुरू रामदेव बाबांवर (Baba Ramdev) का आली असेल? ४००० कोटी रुपयांचं अवाढव्य बजेट असलेल्या ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाची (Ramayan Movie) सध्या संपूर्ण जगभरात तुफान चर्चा रंगली आहे.

दिल्लीतील भव्य ‘भारत मंडपम’मध्ये शनिवारी या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. दिग्दर्शक नमित मल्होत्रा यांच्या या महाकाव्यात अभिनेता रणबीर कपूर आणि सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. याच सोहळ्यात रामदेव बाबांनी ट्रेलर पाहून जी भन्नाट प्रतिक्रिया दिली, त्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ramayan Movie Trailer

“माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाच्या ट्रेलर सोहळ्याला आलोय, पण इथे आल्यावर मला खूप आनंद झाला,” असं सांगत रामदेव बाबांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. ट्रेलरमधील व्हिज्युअल्स इतके जिवंत आहेत की, पडद्यावरून सुटलेला बाण थेट आपल्याच अंगावर येतोय की काय, असा भास होतो, अशी थेट पावती त्यांनी दिली. हा सिनेमा केवळ भारतातच नाही, तर जगभरात नवा इतिहास रचेल, असा मोठा दावाही त्यांनी मंचावरून केला.

यावेळी सोहळ्यात एक गमतीदार किस्साही घडला. जेव्हा रामदेव बाबांनी सिनेमाचं ४००० कोटींचं बजेट ऐकून आपण थक्क झाल्याचं सांगितलं, तेव्हा तिथेच उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना हसू आवरलं नाही.

“स्वामीजी, तुमच्या स्वतःच्या पतंजली साम्राज्याची किंमतच आज २ लाख कोटी रुपये आहे,” असा मिश्कील टोला विश्वास यांनी लगावताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. याशिवाय, सध्या चर्चेत असलेल्या राम मंदिराच्या देणगी चोरीच्या मुद्यावरूनही त्यांनी अत्यंत सूचक विधान केलं. रामचरितमानसमधील एका ओळीचा संदर्भ देत ते म्हणाले की, प्रभू श्रीरामाच्या भक्तीपासून दूर जाऊन कोणीही कधीही सुख मिळवू शकत नाही.

“आजकाल गोष्टी जरा गोंधळात टाकणाऱ्या आहेत, आता हे कोणी आणि कसं समजून घ्यावं हे तुमचं तुम्हीच शोधून काढा. माझं नावच रामदेव आहे, त्यामुळे आम्ही कायम रामासाठीच जगतो,” अशी सडेतोड भूमिका मांडत त्यांनी अप्रत्यक्षपणे अनेकांना चिमटा काढला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही