Share

Nana Patole | “तांबे पिता-पुत्रांकडून कॉंग्रेसला दगाफटका, हा धोका…”; नाना पटोले आक्रमक

🕒 1 min read Nana Patole | नागपूर : : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला. परंतु काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही. यानंतर काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | नागपूर : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला. परंतु काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही. यानंतर काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नागपुरात आज दिली.

आम्ही काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांनी तिकीट दिलं होतं. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरात पक्षाबरोबर फसवेगिरी केली आहे. आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरून त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार आहे. ही एकप्रकारे काँग्रेसशी गद्दारी आहे, असेही ते म्हणाले. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असंही पटोले म्हणालेत.

भाजपने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला होता. काँग्रेसकडून प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे इच्छुक होते. मात्र, काँग्रेसनं त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं सत्यजीत यांनी नमतं घेतल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना तात्काळ पाठिंबा देण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळं हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपच होता, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या