Uddhav Thackeray | “किरीट सोमय्यांनी आपल्या थोबाडाची काळजी घ्यावी, नाहीतर…”;  ठाकरे गटाचा इशारा

Uddhav Thackeray | औरंगाबाद : कोरोनाकाळात झालेल्या घोटाळ्यातील सगळा पैसा उद्धव ठाकरे यांच्या घरात गेल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेची सुपारी घेतली आहे का, सोमय्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बडबड करतो, असे वक्तव्य ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले म्हणणारा किरीट सोमय्या मूर्ख आहे. मग हे एवढे खोके कोणी दिले, हे त्याला महिती आहे का? नागपूरवरून आले का दिल्लीवरून आले? त्याची माहिती काढावी, असा सल्लाही चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दिला.

पुढे ते म्हणाले, शिवसैनिक हे भडकले आहेत. सोमय्या यांना वेळ आल्यावर आम्ही शिवसैनिक काय आहेत हे दाखवू, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. विकासाबद्दल न बोलता शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना काहीही बोलतो. योग्य वेळ आली की किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ, त्याची जीभ पकडू आणि तोतऱ्या… तुझी बडबड सिद्ध करायला सांगू, असंही चंद्रकांत खैरे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? या संदर्भात विचारले असता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. “मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) म्हणाले. “पंकजा मुंडे यांच्याबाबतीत भाजप राजकारण करत आहे. आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत जे काही म्हणाले त्यात तथ्य आहे. पंकजा आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. कधीही काही होऊ शकते”, असेही त्यांनी सांगितले.