Hair Care Tips | केसांना मजबूत आणि लांब बनवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: लांब आणि मजबूत केस (Hair) प्रत्येकालाच आवडतात. प्रत्येक स्त्री आणि पुरुष केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. केसांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादन वापरतात. पण या उत्पादनांचा अनेकदा केसांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे केसांना लांब आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करू शकतात. योग्य आहार घेतल्याने केस व्यवस्थित राहू शकतात. त्याचबरोबर हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते. तुम्हाला पण लांब आणि मजबूत केस हवे असतील, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुढील पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

पालक

पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर पालकाच्या नियमित सेवनाने केस लवकर वाढण्यास मदत होते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात आयरन आढळून येते. आयरन केस वाढवण्यास मदत करतात. शरीरामध्ये जेव्हा आयरनची कमतरता निर्माण होते, तेव्हा केस गळायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला जर मजबूत आणि लांब केस हवे असतील, तर तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश नक्की केला पाहिजे.

अंडी

अंडी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कारण अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळून येते. प्रोटीनच्या मदतीने केसांची वाढ जलद होते आणि केस मुळापासून मजबूत होतात. त्यामुळे आहारात अंड्याचा समावेश केल्याने केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात. त्याचबरोबर नियमित अंडी खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहू शकते.

सुकामेवा

सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते आणि त्याचबरोबर केसही मजबूत राहतात. कारण यामध्ये माफक प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळून येते. ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही सुक्या मेव्यामधील बदाम, अक्रोड, जवस इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button