Nana Patole | “बंडखोर सत्यजीत तांबेंला काँग्रेस पाठिंबा देणार नाही”- नाना पटोले

Nana Patole । नाशिक : महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबे यांनी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. या राजकीय घडामोडी नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

“कालच्या एकंदरीत घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन होतो. याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती दिली होती. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. मात्र, बंडखोर उमेदवारांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, हे स्पष्टपणे सांगातो, असे नाना पटोले माध्यामांशी बोलताना म्हणाले आहेत.

आम्ही काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरात पक्षाबरोबर फसवेगिरी केली आहे. आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरून त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपचा पाठिंबा घेणार आहे. ही एकप्रकारे काँग्रेसशी गद्दारी आहे”, असेही नाना पटोले म्हणाले.

“हा सगळा ठरलेला कार्यक्रम होता. सत्यजीत तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला. नाशिकमध्ये भाजपने उमेदवारदेखील दिला नाही. यावरून हे स्पष्ट आहे. नाशिकमधील पदवीधर लोक अडाणी नाहीत. त्यांनाही हे सर्व समजते आहे, असेही नाना पटोले  Nana Patole म्हणाले आहेत.

“सर्वामागे भाजपचा हात असून भीती दाखवून घरं तोडण्याचं काम सुरू आहे. याचा त्यांना आनंद वाटतो आहे. मात्र, जेव्हा भाजपच्या नेत्यांची घरं फुटतील, तेव्हा त्यांना यांच दु:ख कळेल”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.