पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना धारेवर धरले आहे. नुकतीच हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरला येणार असून मुश्रीफांनी मला अडवून दाखवावं, असं खुलं आव्हान देखील दिलं. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
किरीट सोमय्या पुढच्या आठवड्यात कोल्हापूर जाणार आहेत. “कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीचे आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी मी पुढच्या आठवड्यात कोल्हापूरला जाणार”, असे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी किरीट सोमय्यांना चांगलंच सुनावलं आहे.
कपटी, खोट्या तिरिट सोमय्या भाऊ, अंबाआईच तुम्हाला दर्शन देणार नाही. त्याचा दोष हसन मुश्रीफ साहेबांवर लावू नये. हा, जनतेने अडवले तर मग परत रडगाणे सांगू नका बरं, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरला गेल्यानंतर नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कपटी,खोट्या तिरिट सोमय्या भाऊ ,अंबाआईच तुम्हाला दर्शन देणार नाही.
त्याचा दोष हसन मुश्रीफ साहेबांवर लावू नये.
हा, जनतेने अडवले तर मग परत रडगाणे सांगू नका बरं.— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 13, 2023
किरीट सोमय्यांना येऊ द्या. त्यांनी दर्शन घ्यावं. माझ्या कामाची माहिती घ्यावी. माझ्या सार्वजनिक जीवनाची माहिती घ्यावी. माझे कार्यकर्ते मंदिराकडे जाणार नाहीत. कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असं आवाहन करतो. त्यांनी जे आरोप केलेत त्याचे मी सर्व खुलासे केले आहेत, असं हसन मुश्रीफ सोमय्यांच्या कोल्हापूरला जाण्याबाबत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif | किरीट सोमय्यांना येऊ द्या; माझे कार्यकर्ते… – हसन मुश्रीफ
- Urfi Javed | उर्फी जावेद घेणार रुपाली चाकणकरांची भेट; चित्र वाघांना देणार टक्कर
- BJP | भाजप म्हणजे वाचाळवीर पक्ष; ” मोदी म्हणजे स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म”; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- IND vs SL | टीम इंडिया संकटात! सामन्यानंतर ‘या’ दिग्गजाची खालावली तब्येत
- Amruta Fadanvis | “… अन् बायकोच्या मागे लागतात”, अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य