Amruta Fadanvis | “… अन् बायकोच्या मागे लागतात”, अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Amruta Fadanvis | मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी चर्चेत असतात. सध्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्या आहे. यावेळी त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहे. त्यांचा ‘आज मैं मूड बना लिया’ हे गाणं नुकताच प्रदर्शित झालं आहे. एकीकडे या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे या गाण्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षातली लोक मला ट्रोल करत आहे, असं म्हणतं त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाकडे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायला काहीही नाही, त्यामुळे त्यांनी माझ्यावर निशाणा साधला आहे, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “जेव्हा नेत्यावर बंदूक ताणायला किंवा त्याच्या विरोधात टीका करायला काहीही सापडत नाही. तेव्हा टीकाकार त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. विरोधकही तेच करत आहे. त्यांनी माझ्या गाण्यालाही सोडलं नाही. विरोधकांनी माझ्या भजनावरही टीका केली होती. हे सगळं माझ्या पतीच्या राजकीय पदामुळे केले जात आहे. आता मला ट्रोलिंगची सवय झाली आहे. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी सातत्याने काम करत राहणार आहे. एकीकडे टीकाकार टीका करत असताना दुसरीकडे लोकांना माझं गाणं पसंत पडत आहे.”

अमृता फडणवीस यांचा नुकतंच रिलीज झालेला ‘आज मैं मूड बना लिया’ गाणं एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यामध्ये प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज बघायला मिळाला आहे. या गाण्यामध्ये त्यांनी डान्स देखील केला आहे. त्यांचं गाणं ऐकून आणि डान्स बघून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.