Share

Breaking News | तरुणाने वाचवले ४० प्रवाशांचे प्राण; एसटी बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक

Breaking News | पुणे : सोलापूर- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या एका एसटी बस ड्राइव्हरला अचानक हार्ट अटॅक आल्याने घडणारी मोठी घटना एका तरुणाच्या धाडसामुळे टळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस लातूर जिल्ह्यातील उदगीर डेपोमधून पुण्याकडे निघाली होती.

बस मधून 40 प्रवाशी प्रवास करत होते. पुणे – सोलापूर महामार्गावरून इंदापूर ओलांडून एसटी बस पळसदेव गावाच्या हद्दीत आली. त्यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे ते बसच्या स्टिअरिंगवरच कोसळले.

सर्व प्रवासी झोपेत असतानाच अचानक बस सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला. या आवाजाने बसमधील प्रवासी जागे झाले. खडबडून जागे झालेल्या प्रवाशांनी पाहिले तर बस चालकाने मान टाकलेली त्यांना दिसली.

यानंतर बसमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली. परंतु त्याचवेळी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधन राखत आणि बस थांबवत मोठा अपघात टाळला. यानंतर बसमधील 40 प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

महत्वाच्या बातम्या :

Breaking News | पुणे : सोलापूर- पुणे महामार्गावरून जाणाऱ्या एका एसटी बस ड्राइव्हरला अचानक हार्ट अटॅक आल्याने घडणारी मोठी घटना एका …

पुढे वाचा

Marathi News Pune Travel

Join WhatsApp

Join Now