Share

Ritesh – Genelia Deshmukh | रितेश-जेनेलियाने सर्वांना लावले ‘वेड’

🕒 1 min read Ritesh – Genelia Deshmukh | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Jenelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved) चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला कायम आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूडची … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ritesh – Genelia Deshmukh | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Jenelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved) चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला कायम आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूडची लोकप्रिय जोडी रितेश आणि जेनेलिया दिसले आहे.

रितेश-जेनेलियाने (Ritesh – Genelia) सर्वांना लावले ‘वेड’

‘वेड’ने पहिल्याच दिवशी 2 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर 20.68 कोटी रुपये कमावले. त्यानंतर या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर दहाव्या दिवशी 5.70 कोटींची कमाई केली आहे. यानंतर ‘वेड’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत ‘सैराट’ला मागे टाकलं आहे. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘वेड’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

‘वेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा अभिनेता रितेश देशमुख याने 2003  मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटापासूनच रितेश आणि जेनेलिया यांची प्रेमकथा सुरू झाली होती. या चित्रपटामध्ये दोघे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. त्यानंतर 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’ चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याने ‘क्या कुल है हम’, ‘मालामाल विकली’, ‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘हाउसफुल’, ‘ग्रँड मस्ती’, इत्यादी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यानंतर त्याने ‘लय भारी’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

‘वेड’ या चित्रपटामध्ये बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे मुख्य भूमिकेमध्ये दिसले आहे. हे दोघे 2002 मध्ये रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाला इतके वर्ष झाले आहेत, तरी हे दोघे आजही नव्याने प्रेमात असणाऱ्या जोडप्यासारखे एकमेकांच्या प्रेमात आहे.

रितेश-जेनेलियाने (Ritesh – Genelia) इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असतात

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर हे दोघे मजेशीर रिल्स पोस्ट करत असतात. चाहत्यांकडून या दोघांचे रिल्सला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. ही जोडी ‘वेड’च्या माध्यमातून अनेक दिवसांनी चित्रपटात दिसली असली, तरी इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून ही जोडी नेहमीच्या चाहत्यांना भेटत असते.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या