Skin Care Tips | चेहऱ्याला नियमित साबण लावल्याने होऊ शकतात ‘हे’ तोटे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक दररोज चेहऱ्यावर साबणाचा (Soap) वापर करत असतात. मात्र नियमित साबणाचा वापर करणे चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकते. पीएच पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि चेहरा मऊ ठेवण्यासाठी साबणाऐवजी फेस वॉश वापरण्याचा सल्ला तज्ञ देतात. पण अनेकदा अंघोळ करताना साबणाने चेहरा धुतल्या जातो. त्याचबरोबर अनेक लोक फेस वॉश वापरणे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना असे वाटत असते की साबणाने चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे परिणाम होत नाही. मात्र, नियमित साबणाने चेहरा धुतल्याने चेहऱ्याला अनेक प्रकारच्या तोट्यांना सामोरे जावे लागते. नियमित साबणाने चेहरा धुतल्याने चेहऱ्याला पुढील दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

त्वचा कोरडी होऊ शकते

तुम्ही जर नियमित साबणाने चेहरा धुत असाल, तर तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज व्हायला लागते. साबणामध्ये सर्फेक्टेंट आढळून येते, जे आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. त्याचबरोबर या घटकामुळे त्वचेवर सुरकुत्या लालसरपणा आणि जळजळ देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त कोरडेपणाची समस्या टाळायची असेल तर चेहऱ्याला साबण लावणे टाळले पाहिजे.

त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते

नियमित साबणाच्या वापराने त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते. तुम्ही पण चेहरा दररोज साबणाने दूत असाल तर तुमची त्वचा कोरडी आणि कठोर होऊ शकते. त्वचेवरील नैसर्गिक तेल टिकवून ठेवण्यासाठी चेहरा साबणाने धुणे टाळले पाहिजे. दररोज चेहऱ्याला साबण लावणे हानिकारक ठरू शकते.

वृद्धत्वाची चिन्हे दिसायला लागतात

जर तुम्ही नियमित साबणाने चेहरा धुत असाल, तर तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसायला लागू शकतात. साबणाने चेहरा धुतल्यावर त्वचा लवकर कोरडी होते. परिणामी चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसायला लागू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वृद्धत्वाची चिन्ह टाळायची असेल तर तुम्ही साबण ऐवजी फेसवॉशचा वापर केला पाहिजे.

टीप: वरील माहितीबद्दल संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.