Share

Adhar Card Varification | आधार कार्ड व्हेरिफिकेशन करत असाल?, तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

🕒 1 min read Adhar Card Varification | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड (Adhar Card). आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. सरकारची UIDAI संस्था प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असेल याची पूर्णपणे काळजी घेत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Adhar Card Varification | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड (Adhar Card). आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. सरकारची UIDAI संस्था प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असेल याची पूर्णपणे काळजी घेत असते. त्याचबरोबर ही संस्था आधार कार्डमध्ये होणारे अपडेट ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपाने प्रत्येकापर्यंत पोचवते. UIDAI ने ऑफलाइन वेरिफिकेशन करण्यासाठी नवीन गाईडलाईन सादर केली आहे.

UIDAI ने ऑफलाइन आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी महत्त्वाचे गाईडलाईन जारी केली आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.

सरकारने पुढील गाईडलाईन जारी केली आहे :

आधार कार्ड व्हेरिफिकेशन करण्यासाठी संस्थांना आधार कार्डधारकांची संमती घेणे अनिवार्य आहे.

या संस्थांना आधार कार्डधारकांसोबत विनम्रपणे राहून, ऑफलाइन पडताळणी करण्यास मदत करावी लागेल. त्याचबरोबर आधार कार्ड धारकाची सुरक्षितता आणि गोपनीयतेची खात्री करून घ्यावी लागेल.

UIDAI ने OVSE ला कळवले आहे की, व्हेरिफिकेशन संस्थानांनी आधार कार्डचा ऑफलाइन पडताळणी नंतर रहिवाशाचा आधार क्रमांक वापरू किंवा संग्रहित करू नये.

आधार कागदपत्रांमध्ये छेडछाड करणे ऑफलाइन पडताळणी द्वारे शोधले जाऊ शकते. आधार कागदपत्रांसोबत छेडछाड करणे एक दंडनीय गुन्हा आहे. असे करणाऱ्या व्यक्तीला आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत शिक्षा भोगावे लागू शकते.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Technology

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या