Prakash Ambedkar | “भाजपासोबत गेलो असतो तर काँग्रेस , राष्ट्रवादीचा खिमा केला असता” – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या चर्चेविषयी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणूक शिवसेनेसोबत एकत्र लढण्याबाबत एकमत असल्याचं सांगितलं. “या भूमिकेत कोणतही बदल नाही. पण, शरद पवार आणि काँग्रेसला माझ्याइतका जवळून ओळखणारा महाराष्ट्रातला दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेससोबत जाऊ नये”, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

“आम्ही मागील ३५ वर्षांपासून राजकारणात आहोत. आमचे राष्ट्रावादी, काँग्रेसमुळे नुकसान झाले. मात्र तरीदेखील आम्ही भाजपासोबत गेलो नाहीत. मला माझी ताकद माहिती आहे. मला माझ्या पक्षाची ताकदही माहिती आहे,” असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

“भाजपासोबत जर गेलो असतो तर काँग्रेस , राष्ट्रवादीचा खिमा केला असता. आम्ही ठाकरेंसोबतच्या युतीसाठी तयार आहोत आता फक्त उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी”, असंही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.