Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचा वापर

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू झाला की त्वचेवरील कोरडेपणाची (Dry Skin) समस्या वाढायला लागतात. त्याचबरोबर या वाढत्या थंडीमुळे हाता-पायांचा रंगही गडद व्हायला लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे लोशन आणि क्रीम वापरतात. पण या गोष्टी त्वचेला अल्पकाळासाठीच पोषण प्रदान करतात. तर काही वेळा या गोष्टींमुळे त्वचेला हानी पोहोचण्याचा धोका देखील निर्माण होतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. या गोष्टींचा वापर केल्याने त्वचा चमकदार आणि मऊ राहू शकते. त्याचबरोबर या गोष्टी नियमित लावल्याने त्वचेला पोषण देखील मिळू शकते. त्वचेला नैसर्गिक पद्धतीने चमकदार आणि मऊ ठेवण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करावा.

दुधावरची साय

दुधाची साय त्वचेला पोषण प्रदान करते. दुधाची साय नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला लावल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. हिवाळ्यामध्ये त्वचेला मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही आंघोळीनंतर हाता-पायांना दुधाची साय लावू शकतात. याच्या नियमित वापराने त्वचेचा रंग देखील सुधारण्यास मदत होते.

मध

मधामध्ये मुबलक प्रमाणात अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात हाता-पायांवर मध लावल्याने त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला आंघोळीच्या दहा ते पंधरा मिनिटे आधी त्वचेवर मध लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्वचा कोमट पाण्याने धुवावे लागेल. नियमित हे असे केल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या चमकदार आणि मऊ बनू शकते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये उपलब्ध असते. या तेलामध्ये त्वचेसाठी पोषक असणारे घटक आढळून येतात. हे घटक त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाने हात आणि पायांना मसाज करू शकतात. हिवाळ्यामध्ये नियमित खोबरेल तेल लावल्याने तुमची त्वचा मॉइश्चराईज राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या