Jasprit Bumrah | “टीम इंडियाने आता बुमराहशिवाय…” ; माजी खेळाडूने स्पष्टच सांगितलं

Jasprit Bumrah | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने माघार घेतली होती. दुखापतीनंतर तो या मालिकेमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी तो संघातून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाने आता जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे एका माजी क्रिकेटपटूने स्पष्टपणे सांगितले आहे.

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, निवड समितीने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला या मालिकेमध्ये समाविष्ट केले होते. दरम्यान, ही मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याने यामधून माघार घेतली होती.

टीम इंडियातील माजी खेळाडू आकाश चोप्रा (Akash Chopra) यांनी त्याच्या यूट्यूब चैनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी बुमराहच्या बाबतीत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहे, “बुमराहने सप्टेंबरपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. माझ्या मते टीम इंडियाने आता बुमराहशिवाय खेळण्याची तयारी करायला हवी. मध्यंतरी त्याने एक सामना खेळला. त्यानंतर पुन्हा त्याला दुखापत झाली. तो बराच वेळ झाला टीम इंडियापासून दूर आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “जसप्रीत बुमराहचे नाव टीम इंडियामध्ये समाविष्ट केले आणि नंतर त्याला वगळले. यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ही चांगली गोष्ट नाही. आपल्या सर्वांना माहित आहे बुमरासारखा कोणीही नाही आणि कधी होणारही नाही. मात्र, या वेळची कामगिरी पाहता मोहम्मद सिराज कौतुकस्पद गोलंदाजी करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.