Hasan Mushrif | “कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि…”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

Hasan Mushrif | मुंबई :   राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 11 तासांपासून छापेमारी सुरुच असल्याने कोल्हापुरात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या छापेमारीचा निषेध केला आहे.

अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचारा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. त्यावर आता मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. मुश्रीफ यांनी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सत्ता आली तरी कारवाई केली जाते, असे म्हणत भाजपवर टीका केली. तसेच ईडीकडून कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि नोटीस देण्यात आली नाही. थेट छापे टाकण्यात आले. आता सायंकाळी छापेमारी संपल्यावर नवीन काय आहे ते कळेल असंही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हंटलं आहे.

“ईडीच्या छाप्याचं कारण माहित नाही. पुण्यातील चंद्रकांत गायकवाड माझे मित्र आहेत. तसंच जावयावरील आरोप खोटे आहेत. परंतु त्यांच्याशी व्यायसायिक संबंध नाहीत. काही कारवाई करायची असेल तर समन्स पाठवा, बोलवा, मुलाबाळांना नाहक त्रास देणं चुकीचं आहे,” असंही हसन मुश्रीफ यांनी म्हंटल आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.या व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती. याच खात्यांच्या माध्यमातून मनी लाँडरींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असताना तो ब्रिस्क इंडिया कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला होता. जी मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. याच कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button