Share

Gandhi Godse Ek Yudh | ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांची दमदार भूमिका, पाहा ट्रेलर

🕒 1 min read Gandhi Godse Ek Yudh | टीम महाराष्ट्र देशा: ‘घायल’, ‘दामिनी’, ‘खाकी’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) प्रदीर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल नऊ वर्षानंतर राजकुमार संतोषी सिनेसृष्टीत परतले आहे. राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. नुकताच … Read more

Published On: 

🕒 1 min read

Gandhi Godse Ek Yudh | टीम महाराष्ट्र देशा: ‘घायल’, ‘दामिनी’, ‘खाकी’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) प्रदीर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल नऊ वर्षानंतर राजकुमार संतोषी सिनेसृष्टीत परतले आहे. राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी दर्जेदार भूमिका निभावली आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यामधील वैचारिक युद्ध दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरची सुरुवात भारत-पाकिस्तान फाळणीने होत आहे. त्याचबरोबर ट्रेलरमध्ये चित्रपटातील दमदार डायलॉग ऐकायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे. तर, नथुराम गोडसे यांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. या चित्रपटामध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवण्यात आले आहे.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमारी संतोषी हे जवळपास नऊ वर्षांनी चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचं संगीत लाभलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तर, 25 जानेवारी रोजी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा ‘पठाण’ रिलीज होणार आहे. हे दोन्ही चित्रपट आमने-सामने येणार आहे. प्रेक्षक कोणता चित्रपट बघण्यासाठी गर्दी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या