Sanjay Gaikwad | गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाड संतापले; म्हणाले, ” कोणी मुर्खासारखे…” 

Sanjay Gaikwad | मुंबई : भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे गटाच्या बंडाबाबत बोलताना खळबळजनक वक्तव्य केलं. शिवसेना पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपाने ‘ऑपरेशन’ राबवले असल्याचं ते म्हणाले. गिरीश महाजन यांच्या याच विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, “कोणी मुर्खासारखे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. शिवसेनेचे सर्व आमदार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे होते. आम्हाला वर्षा बंगला तसेच मातोश्रीवर प्रवेश नव्हता. कामासाठी बैठका होत नव्हत्या. सतत सगळे आमदार त्रास्त झाले होते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची कामं जोमात चालू होती. आमचा स्थानिक पातळीवरील लढा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होता.”

राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा टोला देखील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी लगावला आहे.

गिरीश महाजन यांचं वक्तव्य काय?

शिवसेना फोडणे हे भाजपचं मिशन होतं, अशी कबूली भाजप नेते गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात दिली. गिरीश महाजन म्हणाले, आधी आम्हाला सत्तांतरावर विश्वास बसत नव्हता. पण हळू हळू गोष्टी घडत गेल्या. एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ सैन्य बाहेर पडले. शिवसेना पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपाने ‘ऑपरेशन’ राबवले होते.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.