Prakash Ambedkar | एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “ठाकरेंसोबतच्या युतीत…”

Prakash Ambedkar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत सविस्तर सांगितले आहे.

ते म्हणाले, “एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भेट होणारच आहे. मात्र प्रत्येक भेट राजकीयच असते, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाची साथ सोडली तरच त्यांच्याशी राजकीय चर्चा होऊ शकते, अन्यथा आमच्यात चर्चा होऊ शकत नाहीत.”

“आम्ही मागील ३५ वर्षांपासून राजकारणात आहोत. आमचे राष्ट्रावादी, काँग्रेसमुळे नुकसान झाले. मात्र तरीदेखील आम्ही भाजपासोबत गेलो नाहीत. मला माझी ताकद माहिती आहे. मला माझ्या पक्षाची ताकदही माहिती आहे,” असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

ठाकरेंसोबतच्या युतीत कोणताही बदल होणार नाही. भाजपासोबत युती करणार नाही. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. “भाजपासोबत जर गेलो असतो तर काँग्रेस , राष्ट्रवादीचा खिमा केला असता. आम्ही ठाकरेंसोबतच्या युतीसाठी तयार आहोत आता फक्त उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.