Sanjay Raut | “पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलेच आहेत, ते कधीही येतील, पण गुंतवणूक…”; संजय राऊतांचा खोचक टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी 19 जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार नसल्याचं समजतंय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

ते म्हणाले, “पंतप्रधान एका दिवसासाठी, काही तासासाठी येत आहेत. पंतप्रधानांची तारीख बदलता आली असती. पण यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. महापालिका निवडणूक, शिवसेनेला त्रास देणं महत्त्वाचं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलं नाही.”

“पंतप्रधान चांगले आहेत. त्यांना विनंती करा. ते पुढची तारीख देतील. पण दावोसची तारीख मिळणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा निव्वळ राजकीय असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे”, असे म्हणत राऊत यांनी खोचला टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. मी जम्मूकाश्मीरच्या भूमीवर जाणार आहे, राहुल गांधींसोबत राहणार आहे. भारत जोडो यात्रेत जाणार आहे. 20 तारखेला जम्मू पासून या यात्रेत सामील होईल. राहुल गांधी 30 तारखेला काश्मीरला पोहोचणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :