Share

Ajit Pawar | शरद पवारांसोबतच्या बैठकीला अजित पवारांनी फिरवली पाठ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar | पुणे: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद (Sharad Pawar) पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत. अशात आज (15 सप्टेंबर) पुण्यामध्ये वसंतदादा … Read more

Published On: 

Ajit Pawar | पुणे: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद (Sharad Pawar) पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत. अशात आज (15 सप्टेंबर) पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

An executive board meeting has been organized at Vasantdada Sugar Institute in Pune

आज (15 सप्टेंबर) पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.

या बैठकीला कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार (Ajit Pawar) आणि दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, या बैठकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, कंत्राटी भरतीवरून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

रोहित पवारांना उत्तर देत अजित पवार म्हणाले, “आम्हाला सध्या बदनाम करायचं काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकारणात सक्रिय आहोत.

त्यामुळं तरुण-तरुणींचे काय प्रश्न आहे, हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राज्यामध्ये दीड लाख तरुण-तरुणींची भरती आयोजित केली आहे. जे आमच्यावर टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असं आवाहन मी सर्व तरुण-तरुणींना करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही