Eknath Khadse | जळगाव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 18 दिवसापासून आंदोलन करत आहे. सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी सतराव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतलं आहे.
उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे. आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange has withdrawn his hunger strike
एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत आजचं मरण उद्यावर ढकललं आहे.”
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे.
मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.
मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे.
भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली; ठाकरे गटाची मोदींवर टीका
- Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचे सडेतोड उत्तर
- Vijay Wadettiwar | ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | दिल्लीत मनोज जरांगेंच्या नावाची चर्चा; CM शिंदे म्हणतात…
- Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या कल्याणासाठी आमचं सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस