Share

Maratha Reservation | दिल्लीत मनोज जरांगेंच्या नावाची चर्चा; CM शिंदे म्हणतात…

🕒 1 min readMaratha Reservation | जालना: मनोज जरांगे गेल्या 17 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे. आज आंदोलनाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आंदोलन स्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे गेल्या 17 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे. आज आंदोलनाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आंदोलन स्थळी दाखल झाले आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंचा एक किस्सा सांगितला आहे. दिल्लीत जरांगे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.

Who is Manoj Jarange?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो, तेव्हा मला दिल्लीचे लोक विचारत होते की ये मनोज जरांगे कोण है? जिसने पुरी सरकार हिला डाली है.

तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं, मनोज जरांगे एक सामान्य कार्यकर्ता आहे. एका प्रामाणिक हेतूने ते समाजासाठी लढत आहे. या लढाईमध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही.”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीचा मान ठेवून मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ”

“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे.

मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.

मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे.

भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!