Vijay Wadettiwar | नागपूर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी 17 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागं घेतलं असलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
या सर्व प्रकरणावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी उपोषण सोडायला उशीर झाला असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
It was the government’s responsibility to end the hunger strike of Manoj Jarange – Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “जो व्यक्ती समाजासाठी कार्यरत आहे, त्याच्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवं होतं. देर आये दुरुस्त आये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांचं उपोषण सोडवलं आहे.
मात्र, त्याला अत्यंत उशीर झाला आहे. मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्याची जबाबदारी शासनाची होती. त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे. सरकारने लवकरात लवकर आपली जबाबदारी पार पाडायला हवी.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओबीसी समाजाला विश्वासात घेण्याची अत्यंत गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितलं पाहिजे.
या मुद्द्यावरून ज्या ठिकाणी ओबीसी समाज आंदोलन करत आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचं उपोषण सोडवायला हवं. उपोषण मागे घ्यायला लावणं आणि आंदोलन संपवणं एवढचं काम आता सरकारसाठी शिल्लक राहिलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | रोहित पवार आत्ताशी ‘सिनियर केजी’त – नितेश राणे
- Dilip Walse Patil | अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत जरांगेंच्या भेटीला का नाही गेले? दिलीप वळसे पाटील म्हणतात…
- Eknath Shinde | मनोज जरांगे अत्यंत भारी, आमरण उपोषण करणं सोपं नाही – एकनाथ शिंदे
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होणार? CM शिंदेंच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण सोडलं
- Sanjay Raut | राहुल नार्वेकरांनी घटनेशीद्रोह केलाय – संजय राऊत