Dilip Walse Patil | मुंबई: गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अजित पवार (Ajit Pawar) मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी उपोषण स्थळी दाखल होणार होते.
मात्र, फक्त एकनाथ शिंदे जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यात पोहोचले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
मात्र, अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत न आल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar is present in the ministry today – Dilip Walse Patil
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जावो किंवा अजित दादा जावो, एकच गोष्ट आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही राज्याचं प्रतिनिधित्व करत आहे.
राज्यामध्ये सध्या विविध घडामोडी घडत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आज मंत्रालयात उपस्थित आहे. या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आज बऱ्याच बैठका बोलावण्यात आलेल्या आहे.
या सर्व बैठका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. सध्या महाराष्ट्र पुढे जात आहे, काम होत आहे, हे महत्त्वाचं आहे.”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “तुमचा मुलगा अत्यंत भारी आहे, असं मी मनोज जरांगे यांच्या बाबांना सांगितलं आहे. तो स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढत आहे.
मनोज जरांगे यांनी स्वतःसाठी कधीच कोणते प्रश्न मांडले नाही. त्यांनी नेहमी मराठा समाजाबद्दल मागणी केली आहे. आमरण उपोषण करणं सोपं नाही. परंतु, जरंगे यांनी आमरण उपोषण केलं आणि ते जिद्दीने पुढे नेलं आहे.
त्यांनी अत्यंत प्रामाणिक हेतूने हे आंदोलन केलं आहे, त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मी त्यांना उपोषण मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी माझ्या हाताने ज्यूस घेतला आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | मनोज जरांगे अत्यंत भारी, आमरण उपोषण करणं सोपं नाही – एकनाथ शिंदे
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होणार? CM शिंदेंच्या भेटीनंतर जरांगेंनी उपोषण सोडलं
- Sanjay Raut | राहुल नार्वेकरांनी घटनेशीद्रोह केलाय – संजय राऊत
- Maratha Reservation | आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही – मनोज जरांगे
- Uddhav Thackeray | मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झालेय; ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्त्र